मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

रविवार, 3 दिसंबर 2023

Marathi Story !

 छापा की काटा...*


*दोघांचीही निवृत्ती झाली होती,*

  

*साठी कधीच ओलांडली होती,*

 

*अजूनही परिस्थिती ठीक होती,* 

 

*हातात हात घालून ती चालत होती*


*तो राजा ती राणी होती*


*जीवन गाणे गात होती*


*झुल्यावरती झुलत होती*


*कृतार्थ आयुष्य जगत होती*


*अचानक त्याची तब्बेत बिघडते,*


*मग मात्र पंचायत होते,*


*तिची खूपच धावपळ होते,*


*पण कशीबशी ती पार पडते,*


*आता तो सावध होतो,*


*लगेच इन्शुरन्स कंपनी गाठतो,*


*वारसाची पुन्हा खात्री करतो,*


*मृत्यूपत्राची तयारी करतो*

           

*दुसर्‍या दिवशी बँकेत जातो,*


*पासबुक तिच्या हातात ठेवतो,*


*डेबीट कार्ड मशीनमध्ये घालतो,*


*तिलाच पैसे काढायला लावतो,*            


*पुन्हा तिला सोबत घेतो,*


*वीज-पाण्याच्या ऑफिसात जातो,* 


*तिलाच रांगेत उभं करतो,*


*बिल भरायचं समजाऊन सांगतो,*


*अचानक तिला सरप्राईज देतो,*


*टचस्क्रीन मोबाईल हाती ठेवतो,*


*वाय-फाय नेटची गंमत सांगतो,*


*ऑन लाईन बॅकींग समजाऊन देतो,*


*तिलाच सर्व व्यवहार करायला लावतो,*


*नवा सोबती जोडून देतो*


*बाहेरच्या जगात ती वावरू लागते,*


*प्रत्येक व्यवहार पाहू लागते,*


*कॉन्फीडन्स तिचा वाढू लागतो,*


*निश्चिंत होत तो हळूच हसतो,*     


*बदल त्याच्यातला ती पहात असते,*

 

*मनातलं त्याच्या ओळखतं असते,*


*थोडं थोडं समजतं असते,*

 

*काळजी त्याचीच करत राहते,*


*🙏🏻एक दिवस वेगळेचं घडते,*


*ती थोडी गंमत करते,*


*आजारपणाचा बहाणा करते,*


*अंथरूणाला खिळून राहते,*

               

*भल्या पहाटे ती चहा मागते,*


*अन् किचनमध्ये धांदल उडते,*


*चहात साखर कमी पडते,*


*तरीही त्याचे ती कौतुक करते,*


*नाष्ट्यासाठी उपमा होतो,*


*पण हळदीच्या रंगात खूपच रंगतो,*


*दिवसा मागून दिवस जातो,*


*अन् किचनमधला तो मास्टर होतो,*

     

*कोणीतरी आधी जाणार असतं,*


*कोणीतरी मागं रहाणार असतं,*


*पण मागच्याचं आता अडणार नसतं,*


*अन् काळजीच कारण उरणार नसतं,*


*सह-जीवनाचं नाणं उडत असतं,*


*जमीनीवर ते पडणार असतं,*


*आधी काटा बसतो की छापा दिसतो,*


*प्रश्न एकच छळत असतो...*


*एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या सर्व प्रेमळ पती-पत्नींना मनःपूर्वक समर्पित !!


कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller ( 169) Apradh !!

  Why is she living like a married woman ? Suresh was hard towards Nirmal. “ Because it was tougher to find a rented house as unmarried coup...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!