मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शुक्रवार, 16 अगस्त 2024

Aajee Aajoba !! Marathi !!

 *आजीआजोबा म्हणजे काय असतं????*

*सात वर्षे वयाच्या मुलांनी लिहिलेल्या काही गमती जमती..*. 

*इतका सुंदर आरसा. आपला चेहरा नव्याने बघायला मजा येते.*


- आजी एक बाई व आजोबा म्हणजे एक मनुष्य असतो; ज्यांना स्वतःची लहान मुलं नसतात.


- त्यांना इतरांची छोटी मुलं फार आवडतात.


- ते नोकरी करत नाहीत. त्यांना आईबाबांसारखं स्वतःचं काम नसतं, म्हणून ते माझ्याशी खेळतात.


- ते जास्त जोरात धावूपळू वा खेळू शकत नाहीत.

पण मला छान छान खेळ आणून देतात.


- फिरायला गेलं की हे लोक झाडाची पानं नाहीतर किडे बघत बसतात... फोनमधे वाट्टेल त्या गोष्टीचे फोटो काढतात...व एकमेकांना दाखवत बसतात.


- फुलांचे रंग नि फळांचे गुण ते मला सांगतात. मला फक्त फळं खायला आवडतात.


- त्यांना कसलीही घाई नसते, म्हणून मलाही ते घाई करत नाहीत. निवांत असतात.


- बहुतेकदा ते जाडे गुबगुबीत असतात, पण इतकेही जाड नसतात की मला बूट घालून देऊ शकत नाहीत.


- ते चष्मा लावतात व वेगळेच गमतीदार गबाळे कपडे घालतात.


- आजोबांना केस कमी असतात, तरी ते जोरजोरात तेल लावून भांग पाडत बसतात, मग आजी त्यांना हसते.


- आजीचे केस दरवेळी निरनिराळ्या रंगाचे असतात, पण आजोबा तिला हसत नाहीत, कारण त्यांचं तिच्याकडे फारसं लक्ष नसतं. ते पेपरमधे डोकं खुपसून बसलेले असतात. म्हणून ते हुशार असतात.


- आजीआजोबा दात व हिरड्या तोंडातून बाहेर काढू शकतात.


- ते दोघेही खूप स्मार्ट नसतात तरीही ते गोड दिसतात. कधीकधी आईबाबांना तसं वाटत नाही.


- "देवाचं लग्न झालंय का नाही ??.. "कुत्रे मांजरांच्या मागे का लागतात??.."..अशा प्रश्नांची उत्तरं त्यांना येतात. यायलाच हवीत.


- गोष्टी वाचून दाखवताना ते काहीही गाळत नाहीत, खूप बारकाईने वाचून दाखवतात.

एक गोष्ट परत परत वाचायचीही त्यांची तयारी असते.


- झोपण्यापूर्वी मला तोंडात टाकायला खाऊ लागतो हे त्यांना बरोब्बर कळतं.


- ते माझ्याबरोबर श्लोक पाढे म्हणतात आणि म्हणताना माझं काही चुकलं, तरी माझ्या पाप्याच घेतात.


- आजोबा जगातील सर्वात हुशार व स्मार्ट मनुष्य असतात कारण ते मला खूपखूप नवीन गोष्टी शिकवतात. मला ते जास्त वेळ मिळायला हवेत.


- आजी तर प्रत्येक छोट्या मुलाला हवीच. ती असायलाच हवी. खासकरून जर आई-बाबा तुम्हाला टीव्ही वा टॅब बघायला देत नसतील तर आजी हवीच. ती आपली करमणूक करते, छान खाऊ करून देते. तिला आपल्यासाठी खूप वेळ असतो. तो ती आपल्याबरोबर आनंदात घालवते.


"आजीआजोबा-नातवंडं नातं युनिव्हर्सली गोडच असतं नाही का ?"...

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Amazing !!

 *Wonderful facts of the life!* *If a cat crosses the road it is said to be bad omen. But most accidents take place when dogs cross the road...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!