मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शुक्रवार, 2 अगस्त 2024

Dharm & Darshan !! Marathi

 *देवाला नैवेद्य समर्पण...*


स्वयंपाक झाला की सर्व साधारण सर्व घरात देवाला नैवेद्य दाखवायची प्रथा आहे. किंवा काही घरात रोज नाही पण सणासुदीला, कार्य प्रसंगी नैवेद्य दाखवतात.*


*आपण देवाला नैवेद्य दाखवताना आधी पाण्याचा एक चौकोन काढतो मग त्यावर ताट देवासमोर ठेवतो. मग खालील मंत्र म्हणून एक एक घास ५ वेळा देवाला भरवतो. मग दोनदा ताटाभोवती पाणी फिरवतो.*


*ॐ प्राणाय स्वाहा।*

*ॐ उदानाय स्वाहा।*  

*ॐ समानाय स्वाहा।*   

*ॐ व्यानाय स्वाहा।*

*ॐ अपानाय स्वाहा।*


*नैवेद्यं समर्पयामि॥*


*किंवा ब्रह्मणे स्वाहा॥* 


*असे म्हणून नैवद्यामध्ये पाणी समर्पयामी म्हणत पाणी सोडतो.* 


*हे आपण पूर्वापार करत आलो आहोत. पण असे करण्यामागे मुख्य कारण काय आहे? मी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मला जे माहिती झाले ते मी तुमच्या जवळ व्यक्त करतो. नुसते अंधानुकरण नको.*


*नैवेद्य देवाला रोज दाखवावा. जितक्या वेळा आपण अन्न ग्रहण करतो तितक्या वेळा आपल्या मधे असणार्या चैतन्य स्वरूपाला दाखवावयाचा आहे.*


*पूर्वी मातीच्या जमिनी शेणानी सारवलेल्या असायच्या. त्यामुळे जेवायला बसण्या अगोदर साधारण ताट राहिल एवढ्या चौकोनाला पाणी फिरवून जागा साफ करायची. ताटाभोवती रांगोळी काढायची कारण काही जीव जंतू त्याच्या आजूबाजूला फिरु नयेत म्हणून.* 


*कारण रांगोळीच्या या खरखरीत पणावर जीवजंतूना चालायला अवघड जाते. मग जेवणाचे ताट मधे ठेवून भोवती पाणी फिरवायचे. कारण वाट चुकून आलेला  एखादा जीवजंतू ताटापर्यंत येऊ नये म्हणून. आता या ताटाचा नैवेद्य हा आपल्या देहात असलेल्या परमेश्वराला दाखवायचा आहे. कोणत्या मूर्तीला किंवा फोटोला नाही.*


*आपले शरीर हे पंचतत्वानी बनलेले आहे. त्या पाचही तत्वांचे नाव घेऊन आपल्या शरीरात उत्पन्न झालेल्या जठराग्नीला अन्नाची आहुती द्यायची आहे, म्हणजेच एक एक घासभरवायचा आहे.* 


*या पाचही तत्वांची विशिष्ठ जागा आहे.* 


*>>  प्राण म्हणजे वायू त्याची जागा आहे* 


*>>  नाक, तोंड उदान (पाणी) याची जागा आहे*


*>>  कंठ समानाय (अग्नी) याची जागा*


*>>  नाभी व्यानाय (आकाश ) याची जागा सर्वांगात आहे* 


*>> आणि अपानाय (पृथ्वी ) ची जागा गुदद्वार.*


*अशातऱ्हेने तोंडापासून सुरु होणारी पाचनक्रिया मलमूत्र विसर्जनापर्यंत पोहचते. अन्न ग्रहण ते विसर्जन हे सर्व कार्य निर्विघ्न पार पडावे यासाठी हे मंत्र उच्चार आहेत.*


*ॐ प्राणाय (वायू)स्वाहा।* 


*ॐ उदानाय (पाणी) स्वाहा।*


*ॐ समानाय (अग्नी) स्वाहा।*  


*ॐ व्यानाय (आकाश) स्वाहा।*


*ॐ अपानाय (पृथ्वी )स्वाहा।*  


*नैवेद्यं समर्पयामि ॥*


*हा मंत्र आपण दोनदा म्हणतो. याचे कारण असे आहे ताटात वाढलेला पदार्थ संपला की आपण पुन्हा वाढतो ना किंवा घेतो ना? तर दुसर्यांदा मंत्राचा उच्चार ही विचारणा आहे, अजून काही हवे का? अशी. आणि  सरतेशेवटी आपण नैवेद्यात पाणी सोडतो म्हणजे आता काही नको. जेवण पूर्ण झाले. भोजन करणे हा एक यज्ञ आहे.*


*आता मला सांगा अंधानुकरण करत आपण आपल्या शरीरात सदैव रहाणार्‍या भगवंताला उपाशी ठेवत होतो इतके दिवस.*


*हृदयातील भगवंत राहिला हृदयातून उपाशी हा भगवंत आहे म्हणून आपले अस्तित्व आहे. आपण करत नसलेल्या अनेक क्रिया तो करत असतो. आपल्या श्वासांमध्ये तो आहे.*


*अन्न खाणे, पचन, पचलेल्या अन्नाचे पोषणासाठी लागणारे घटक तयार करणे, त्यातन रक्त निर्मिती आणि त्याला संपूर्ण शरीराला पोहचवणे आणि नको असलेल्या घटकाना मलमूत्राद्वारे बाहेर फेकणे या पाच क्रियांसाठी लागणारी उष्णता म्हणजेयज्ञ.*


*या हवनासाठी लागणारा मुख्य घटक म्हणजे आपले अन्न. अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे. त्याचा आदर केला पाहिजे. ताटात अन्नाचा एकही कण वाया घालवू नका. आपण जेवणाच्या आधी हा श्लोक म्हणतो.*


*वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे।* 


*सहज हवन होते नाम घेता फुकाचे।*


*जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म।* 


*उदरभरण नोहे जाणिजे यज्ञकर्म॥*


*अन्न ग्रहण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही. त्यामुळे  जेवताना आपण प्रसन्न असावे. आजूबाजूचे वातावरणही प्रसन्न असावे कारण हा एक यज्ञ आहे.*

 *एकदा जगद्गुरु शंकराचार्यांना एका व्यक्तीने प्रश्न केला, देवाला नैवेद्य का दाखवायचा? आम्ही जो नैवेद्य दाखवतो, त्यातील काहीही देव खात नाही. ना ही त्या पदार्थात  कुठला बदल होतो. मग नैवेद्य कशासाठी? नैवेद्य हे थोतांड नाही का? शंकराचार्य जराही विचलित झाले नाहीत. त्यानी शांतपणे उत्तर दिले. "जेव्हा कोणी एक व्यक्ती देवाला नैवेद्यासाठी पेढे घेऊन जातो, तेव्हा रस्त्यात कुणी भेटला तर त्याला तो काय सांगतो ? हे पेढे  माझे आहेत, मी आणलेय देवासाठी."  पण तेच पेढे जेव्हा तू नैवेद्य दाखवून आणतोस, तेव्हा कुणी विचारलेस तर तू काय सांगतोस... "हा देवाचा प्रसाद आहे, हा रामाचा प्रसाद आहे, हा हनुमानाचा प्रसाद आहे." हे माझे नाही, तर परमेश्वराचे आहे... ही भावना मनात रुजू होते. हीच तर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. त्या प्रसादाने तुझ्यातला "मी" बाहेर फेकला गेला. परमेश्वराला नैवेद्य दाखवल्याने माणूस त्याच्यापुढे नत  मस्तक होतो. अहंकार- रहित होतो. स्वच्छ आणि निर्मल मनाची त्याला अनुभूती येते, हेच महत्व आहे नैवेद्य आणि प्रसाद यांचे. म्हणूनच नेहमी घरात काहीही गोड धोड केले की, सणासुदीला देवाला नैवेद्य दाखवण्याची प्रथा अपल्या संस्कृतीत आहे. देवाची आठवण सुखाच्या प्रत्येक प्रसंगी असावी हा एक उद्देश तर आहेच पण "मी पणा नाश पावावा" हा देखील उद्देश आहेच.*


🙏

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Amazing !!

 *Wonderful facts of the life!* *If a cat crosses the road it is said to be bad omen. But most accidents take place when dogs cross the road...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!