मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

गुरुवार, 30 जनवरी 2020

Dharm & Darshan !! {MARATHI } GAIRSAMAJ !!

*गैरसमज हे असे निर्माण होतात*

 *गैरसमज...*

*भगवान बुद्धांनी गैरसमज कसा निर्माण होतो हे एका कथेतून स्पष्ट केले आहे...*

एका जंगलात एक जोडपं राहत असत, हा जंगलात जाऊन लाकूडे तोडायचा आणि ती जवळच्या शहरात जाऊन विकायचा...
काही दिवसांनी त्यांच्या घरात एक सुंदर बाळ जन्माला येत.
एक दिवस त्याला जंगलात एक निरागस आणि घाबरले मुंगूसाच पिल्लू दिसत जवळच कोणत्यातरी जंगली श्वापदाच्या हल्ल्यात त्याची आई मरून पडली होती.
तो त्या पिल्लाला घरी आणतो.
थोड्या दिवसांतच ते पिल्लू त्या घरात एखाद्या सदस्यां प्रमाणे रूळते...
एक दिवस नेहमीप्रमाणे जंगलात आपल्या कामासाठी न्याहारी करतो आणि  निघून जातो...
नंतर थोड्या वेळाने आपल्या बाळाला झोपवून ती पाणी आणण्यासाठी निघून जाते.
घरात फक्त बाळ आणि ते माणसाळलेल मुंगूस...
काही वेळातच त्या घरात एक भला मोठा साप शिरला आणि तो त्या बाळाकडे चाल करू लागला...
मुंगूसाने चपळाईने सापावर झडप मारली आणि सुरु झाली लढाई...
साप पण बलाढ्य होता पण मुंगूसाने त्याच्यावर मात केली मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर सापाच्या रक्ताने माखले होते...

*आता मुंगूस दारात उभे राहून बाळाच्या आईची वाट बघत होते...*

तेवढ्यात बाळाची आई  डोक्यावर हंडा घेऊन आली आणि बघते तर काय...???

*मुंगूसाचे तोंड आणि पूर्ण शरीर रक्ताने माखले होते*

तिच्या डोक्यात एकच विचारांच वादळ ऊटल की तीच्या बाळाचे लचके त्या मुंगूसाने तोडले आणि त्याला मारुन टाकले...

*पण मुंगूस मात्र तिच्याकडे खूप निरागसपणे बघत होते*

मात्र त्याचवेळी तिने बाळाच्या नावाने एकच टाहो फोडला...
आणि

*क्षणार्धात डोक्यावरील हांडा तिने त्या मुंगूसाच्या अंगावर फेकला*

आणि....
घरात पळत सुटली पण घरात जाताच तीला चित्र वेगळंच दिसलं तीच बाळ अजूनही झोपलच होत.
आणि

शेजारीच तो भयानक साप रक्ताच्या थारोळ्यात मरून पडलेला...

ती भानावर आली आणि सर्व प्रकार तिच्या लक्षात आला तशी ती चपळाईने उठली आणि बाहेर आली पण मुंगूस बिचारे जागेवर  ठार झाले होते..

तिने पुन्हा एकदा टाहो फोडला पण यावेळी तीचे दोन्ही हात जोडलेले होते......

भगवान बुद्ध सांगतात जे दिसतय ते बघा...
पण त्याआधी जे दिसत नाही ते शोधायचा प्रयत्न करा,कारण प्रश्न जीवलग माणूस गमवण्याचा आहे...
*कारण...*
*गैरसमज हे जवळच्या माणसाबद्दल होतो, आणि...तो गैरसमज वेळ निघून गेल्यावरच दुर हाेताे...!!* स्वतःच्या डोळ्यांनी पाहील्याशिवाय व कानाने ऐकल्याशिवाय विश्वास ठेऊ नका.

 *जबाबदारीची जाणीव असणारा कधीच हात वर करू शकत नाही!*
*आणि हात वर करणारा कधीच जबाबदारी सांभाळू शकत नाही....!*

"तुझं माझं करता करता एक दिवस जायचं आहे,,
जे कमावलं ते इथेच ठेवून जायचं आहे,,
करा तुम्ही चांगले कर्म
सोबत तुमच्या तेच तर जाणार आहे,,
रडल्याने तर अश्रूसुध्दा परके होतात,,
हसल्याने परके सुध्दा आपले होतात,,
मला ती नाती आवडतात ज्यात
मी नाही तर आपण असतो.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharm & Darshan !! Datta Mandir , Indore !!

 यह चित्र इंदौर के प्राचीन दत्त मंदिर का है इस मंदिर से शिवाजी और उनके गुरु रामदास जी का भी संबंध रहा है। यह मंदिर संजय सेतु के नजदीक है। इं...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!