आज एक वेगळीच कथा आपल्याला सांगणार आहे. .............
आपल्यापैकी बर्याच जणांनी सज्जनगड पाहिला असेल.
गडावर असलेले समर्थांचे समाधी मंदीर सुद्धा पाहिले असेल आणि त्यांचा राहता वाडा किंवा मठ तो देखील पाहिला असेल.
छत्रपती संभाजी महाराजांनी केवळ पावणे दोन महिन्यांमध्ये बांधलेल्या ह्या मंदिरामध्येच वरच्या बाजूला प्रभू रामचंद्रांच्या मूर्ती आहेत, परंतु हे मंदिर ही गडावरची सगळ्यात जुनी वास्तू नाही. तर शिवछत्रपतींनी स्वतःच्या निवासासाठी बांधलेला वाडा ही गडावरची सर्वात जुनी वास्तू आहे. समर्थांनी आपल्या आयुष्यातला अखेरचा महत्त्वाचा काळ सज्जनगडा वरती व्यतीत केला आणि तशी त्यांना शिवछत्रपतिँनीच विनंती केली होती हे आपण जाणतो. परंतु आपल्या राहत्या वाड्यामध्ये समर्थांना मुक्कामास ठेवून घेतलेल्या शिवछत्रपतींनी गडावरती आल्यावर जेव्हा वाड्या शेजारी असलेला मोठा खड्डा पाहिला, तेव्हा त्यांनी तो खड्डा बुजवून टाकण्याची आज्ञा मावळ्यांना दिली. त्यावर श्री समर्थांनी शिवरायांना विनंती केली की कृपया तो खड्डा बुजवून नये कारण पुढे त्याचा मोठा उपयोग व्हावयाचा आहे.
समर्थांनी संपूर्ण भारतभरात मठस्थापना केली हे तर आपण जाणतोच त्यातील बरेचसे मठ आजच्या तमिळनाडू राज्यामध्ये आहेत. तमिळनाडूमध्ये अरणी नावाचे एक गाव आहे. येथील हातमागावर विणलेल्या आणि अक्षरशः काडीपेटी मध्ये बसेल इतकी छोटी घडी होणाऱ्या आरणी च्या रेशमी साड्या माता-भगिनींना सुपरिचित असतीलच. तेच हे अरणी गांव जिथे समर्थांचे नेहमी येणे जाणे असे. हे ठिकाण तंजावर पासून तसे जवळ आहे. तंजावर मध्ये समर्थांचे आजही सात मठ कार्यरत आहेत, असो. तर या अरणी गावांमध्ये पितळयापासून किंवा पंचधातू पासून देवदेवतांच्या अत्यंत सुंदर मूर्ती घडविणारे अनेक कारागीर परंपरागत राहत आहेत .आजही आहेत.
गुणग्राहकतेचा सदैव ध्यास असलेल्या समर्थांना निश्चितच असे वेड लागले की या सर्व मूर्ती कारांमध्ये सर्वात उत्कृष्ट कला अंगी असलेला मनुष्य कोण असेल ? तेव्हा त्यांना असे कळले की असा एक वृद्ध कारागीर तिथे आहे परंतु मूर्ती करताना उडणारे धातूचे कण डोळ्यामध्ये गेल्यामुळे त्याची दृष्टी अधू झालेली आहे त्याला अजिबात दिसत नाही त्यामुळे आता त्याने मूर्तिकला थांबविली आहे. समर्थांना खूप वाईट वाटले आणि त्या वृद्ध कारागिराने आयुष्यभर केलेल्या परमेश्वराच्या सेवेचे फळ म्हणून की काय साक्षात समर्थ त्यांच्या दारात जाऊन हजर राहिले. समर्थ त्या कारागिराला म्हणाले की मला माझ्या नित्य पूजेसाठी रामाचे पंचायतन बनवून हवे आहे आणि ते तुमच्या हातूनच बनविले पाहिजे असा माझा अट्टाहास आहे. वृद्ध कारागीर रडू लागला . त्याने समर्थांना सांगितले की हे साधू मला आता दृष्टी उरलेली नाही त्यामुळे आपली ही इच्छा पूर्ण होण्याची शक्यता नाही. यावर समर्थांनी त्या कारागिराला जे उत्तर दिले ते अक्षरशः हृदयात कोरून ठेवण्या सारखे आहे.
समर्थ त्याला म्हणाले , "अरे बाबा माझ्या प्रभू रामचंद्राचे दर्शन घेण्यासाठी या चर्मचक्षूंची अजिबात आवश्यकता नाही. तो आत्माराम तर तुझ्या माझ्या अंतरंगात वास करतो आहे .त्याचे दर्शन आपल्याला आपल्या अंत:चक्षूंनी सुद्धा होऊ शकते.
आणि बहुतेक रामरायाची अशी इच्छा दिसते की तुझ्या हातूनच पुन्हा प्रकट व्हावे त्यामुळे तुच त्या मूर्ती घडविणार आहेस. " असे म्हणत समर्थांनी त्या कारागिराच्या डोक्यावरती हात ठेवला आणि पाहता पाहता त्याचे देहभान हरपले त्याच्यासमोर तेजाचा एक मोठा झोत दिसू लागला ! पाहता पाहता त्या तेजाच्या गोळ्याचे रूपांतरण प्रभू रामचंद्रांच्या अत्यंत सुंदर मनोहरी अशा मूर्ती मध्ये झाले ! साक्षात प्रभू रामचंद्रांनी त्या कारागिराला दर्शन दिले ! तो अक्षरशः कृतकृत्य झाला !
समर्थांच्या भेटीने त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्याने विना विलंब अत्यंत सुंदर अशा प्रभू रामचंद्र ,श्री सीतामाई ,श्री लक्ष्मण आणि समोर उभा ठाकलेला दासमारुती, अशा अप्रतिम मूर्ती हातोहात घडविल्या. त्या मूर्ती पाहून समर्थ अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या कारागिराला विचारले की तुला काय हवे ते माग, त्यावर आरणीकर त्यांना म्हणाला समर्थ आपले दर्शन जाहले ,साक्षात प्रभू रामचंद्रांचे दर्शन झाले !या डोळ्यांनी आता अन्य काही पहायची इच्छा उरलेलीच नाही. त्यामुळे माझी दृष्टी पूर्ववत आंधळी करून टाकावी इतकीच आपल्याला प्रार्थना आहे ,म्हणजे सतत त्या आत्मारामाच्या चिंतनात उरलेला काळ व्यतीत करता येईल ! समर्थांनी त्याची दृष्टी काही घालविली नाही परंतु सतत त्या आत्मारामाचे दर्शन घडेल अशी आत्म दृष्टी त्याला देऊ केली. अनुग्रह देऊ केला. आणि भरभरून आशीर्वाद दिले.
समर्थ गडावरती आले . त्या मूर्ती आज आपण ज्याला समर्थांचे शेजघर म्हणतो त्याचे घरामध्ये १४ दिवस त्यांनी पुजल्या . आजही त्या खोलीमध्ये राम मूर्तींचा ओटा म्हणून चंदनाची अत्यंत सुबक कलाकुसर असलेला एक लाकडी ओटा ठेवलेला आहे पहा त्यावर तिच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. पंधराव्या दिवशी समर्थ आपल्या आसनावरून खाली जमिनीवरती येऊन बसले, पद्मासन लावले ,दृष्टी नासाग्र स्थिर झाली ,डोळे मिटले .त्रिवार रामरायाचा जयजयकार केला आणि त्यांच्या देहातून प्राणज्योती चा मोठा लोळा बाहेर पडून तो थेट त्या रामाच्या मूर्तींमध्ये प्रवेश करता झाला हे सर्व उपस्थित शिष्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तो दिवस होता माघ वद्य नवमी चा. ही बातमी छत्रपती संभाजी महाराजांना कळताच ते जातीने सज्जनगडा वरती उपस्थित झाले आणि मठाच्या शेजारी जो मोठा खड्डा होता तिथेच समर्थांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले. दुसर्या दिवशी त्या चितेच्या स्थानी एक स्वयंभू समाधी प्रकट झाली. त्याच समाधी वरती पावणे दोन महिन्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत सुबक असे समाधी मंदिर बांधले व समाधीच्या बरोबर वरच्या बाजूला प्रभुरामचंद्रांचा ह्याच मूर्तींची स्थापना करण्यात आली. स्वतः समर्थांचे प्राण या मूर्तीमध्ये प्रविष्ट झालेले असल्यामुळे त्या मूर्तींची वेगळी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली नाही. असे कदाचित भारतातील हे एकमेव मंदिर असावे. त्यामुळेच ह्या मूर्ती वर्षातून पाच वेळा जागेवरून हलविल्या जातात व बाहेर अंगणामध्ये आणून स्वच्छ धुतल्या जातात जी सेवा कोणालाही मिळू शकते. या विधीला उद्वार्चन असे म्हणतात. आपण ह्या मूर्तीचे नीट निरीक्षण केले असता आपल्याला असे लक्षात येईल की आरणीकराने रामरायाला डोळे तेवढे काढलेले नाहीत. एका अंध कारागिराने केलेल्या मूर्तीची ओळख म्हणून आजही ती कायम राहिलेली आहे ! प्रभू रामचंद्राच्या या मूर्तीचे जर आपण निरीक्षण करत राहिलो तर तासनतास त्या मूर्तीकडे पहातच रहावेसे वाटते इतकी ती सुंदर आहे कारण ती साक्षात प्रभू रामचंद्राला समोर उभे करून बनविण्यात आलेली आहे ! अशा या सुंदर मूर्तीचे दर्शन आपण पूर्वी घेतले असेल तर आपण भाग्यवान आहातच परंतु जर अजून घेतले नसेल तर एकवार अवश्य सज्जनगडावर जाऊन ह्या मूर्तीचे अवलोकन करावे आणि या आयुष्यामध्ये धन्यता कशाला म्हणतात त्याचा अनुभव घ्यावा ! वरील माहिती आपल्याला नवीनच कळली असेल तर ती आपल्या आप्तेष्टांना देखील कळावी म्हणून म्हणून पुढे पाठवावयास काहीही हरकत नाही.
श्री समर्थांचे अवघे वांङ्मय जगभरातून कुठूनही वाचता यावे यासाठी निर्माण केलेल्या खालील संकेतस्थळाचा प्रचार-प्रसार आपले धर्म कर्तव्य समजून अवश्य करावा ही आपल्या चरणी नम्र प्रार्थना
! जय जय रघुवीर समर्थ !

कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें