मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

मंगलवार, 4 फ़रवरी 2020

TATA : A complete institution !! ( Marathi )

*टाटा पुराण*
परवा सहजच पारल्यात गेलो होतो. रोजचंच कॅन्टीनमध्ये खाऊन कंटाळा आला होता म्हणून उदरभरण आणि मग मॅजेस्टिक पुस्तक जत्रेत एक फेरफटका मारला. हे दालन म्हणजे अलिबाबाची गुहा आहे. विविध विषयांवरील पुस्तकं आपण नुसती बघूच नाही तर आरामात वाचू ही शकतो.
तेल क्षेत्रात कामाला असल्याने गिरीश कुबेर यांचे गाजलेलं पुस्तक, "हा तेल नावाचा इतिहास आहे "शोधत होतो. ते उपलब्ध नाही असं कळलं. अचानक एक त्यांनीच लिहिलेलं जाडजूड पुस्तक नजरेत पडलं. उत्सुकतेपोटी हातात घेतलं...."टाटायन". चाळता चाळता वाटलं की हे संग्रही असायला हवं. विकत घेऊनच बाहेर पडलो आणि मठीत आल्यावर अधाशासारखं वाचून काढलं.
आता पुढे जे मी मांडतोय ते मला जाणवलेलं टाटांचं मोठेपण.
भारत इंग्रजांच्या अधिपत्याखाली असताना सशस्त्र क्रांती किंवा अहिंसक मार्गाने स्वराज्यासाठी कदाचित प्रयत्न नाही केले पण 1874 साली नागपूरला एम्प्रेस मिल सुरु करणारे जमशेदजी टाटा हे मेक इन इंडिया चे आद्य पितामह.
कापूस व्यापारात खोट आली म्हणून त्यांच्या वडिलांनी राहतं सातमजली घर विकून कर्ज फेडले पण विश्वास ढळू नाही दिला लोकांचा. टाटा म्हणजे विश्वास हे समीकरण तेंव्हाच कुठेतरी तयार झालं.
मिल मधे रोज 20 टक्के कामगार गैरहजर कारण नागपूरकडे लोकांना काम करायची सवय नाही...म्हणजे तेंव्हाही नव्हती. तर punitive action न घेता कामगारांना motivation म्हणून employee pension scheme सुरू केली पहिल्यांदा जमशेदजी यांनी. आणि तेंव्हा इंग्लंडमध्ये ही ती नव्हती.
मयूरभंज ला( म्हणजे आताचं जमशेदपूर)TISCO आणि मुंबई ला हॉटेल ताजमहाल...हे प्रकल्प सुरू करणारे जमशेदजीच.
ते नागपूरला येताना via जबलपूर आले तेव्हा भेडाघाटचा धुवांधार धबधबा बघून निसर्ग सौंदर्य न्याहाळत बसताना त्यांना इथे वीजनिर्मितीचा प्रकल्प टाकावासा वाटला पण जमीन विकत नाही मिळाली तेंव्हा, कारण एक मठ होता तिथे कोणा स्वामींचा आणि हटवले तर धार्मिक भावना वगैरे दुखावतील म्हणून. आणि जबलपूरकर प्रगतीला मुकले.
भारतात संशोधन केंद्र असावे म्हणून बंगलोर ला indian institute of science स्थापणारे जमशेदजी.
गालिब म्हणतो..हजारों ख्वाहिशें ऐसी के हर ख्वाहिश पे दम निकले...इथे तर जमशेदजी तीन तीन स्वप्नं बघत होते तेही डोळसपणे.
आणी ती स्वप्ने पूर्णत्वास नेणे हेच दोराबजींच्ं म्हणजे त्यांच्या मुलाचं, भागधेय होतं जणू काही.
स्वप्ने पूर्ण करता करता उगीच चटणी,कोशिंबिर तोंडी लावावी तशी TOMCO म्हणजे टाटा ऑईल मिल्स ची स्थापना केली.कोचिन ला.
आपल्या लहानपणी तीन साबण सुप्रसिद्ध होते. मोती,हमाम आणी कपडे धुवायचा 501 बार.आठवतात का? आणी तो पिवळ्या रंगाचा टाटा शाम्पू. हे सर्व TOMCO products.
बरं एवढ्यावर न थांबता the new india assurance ही विमा कंपनी पण दोराबजींच्ं अपत्य. अजुनही ही कंपनी आहे फक्त आता मालक सरकार झालय.मुंबई पुणे मार्गावरचा वळवण hydro electric project ही टाटांचाच.
एक अजून जाता जाता माहिती म्हणजे ऑलिम्पिक चळवळींची भारतात सुरवात केली दोराबजी टाटा यांनी. 1924 च्या पॅरिस ऑलिम्पिक साठी भारतीय टीमचा पूर्ण खर्च उचलून.
संपत्तीचा समाजासाठी उपयोग व्हावा म्हणून स्वतःची पत्नी रक्ताच्या कर्करोगाने गेल्यावर दोराबजींनी लेडी टाटा ट्रस्ट स्थापला. आताचे मुंबई चे टाटा कॅन्सर रुग्णालय ही त्याच ट्रस्टची निर्मिती.
आता हे सर्व करताना दोराबजी यांना साथ होती ती रतनजी टाटा यांची. म्हणजे दोराबजींचे चुलत काका.
जमशेदजींना दिलेलं वचन पूर्ण करायला पहाडासारखे उभे राहिले दोराबजींच्या पाठीशी.
खरं तर फ्रेंच रमणी सोबत विवाह केल्याने दोराबजी विरोधात होते पण जमशेदजींनी समजवलं.
ह्यांचाच सुपुत्र जे आर डी टाटा.....
आई फ्रेंच असल्याने शिक्षण फ्रांस मधे झालं. नागरिकत्व फ्रेंच, पण परिस्थितीमुळे टाटांच्या साम्राज्याचा डोलारा सांभाळायला चेयरमन झाले टाटा कंपनी चे आणि पहिलं काम केलं असेल तर भारतीय नागरिकत्व पत्करून फ्रेंच नागरिकत्व सोडलं. फ्रेंच भाषेतच विचार करणारा हा माणूस पूर्ण भारतीय झाला.
कराची ते मुंबई विमान उडवून भारतात विमानसेवेचा पाया रचला. चक्क विमान कंपनीच काढली.आधी टपाल सेवा देणारी ही कंपनी पुढे झाली एअर इंडिया!!
पुढे नेहरू सरकार ने ती गिळंकृत करून सरकारीकरण केले. त्या काळात अत्यंत व्यावसायिक सेवा देणारी ही कंपनी आता पांढरा हत्ती झालीय. निर्गुंतवणूक करायला काढून आता एक वर्तुळ पूर्ण होतंय.
टाटा केमिकल्स.....पूर्ण बोर्ड विरूद्ध असताना दरबारी सेठ ह्या नवख्या माणसाच्या पारड्यात आपले वजन टाकलं जेआरडींनी आणि कंपनी निघाली. टाटा मीठ ते टाटा स्वच्छ पर्यंत सब कुछ बनवणारी.
टेल्को ..सुमंत मुळगावकरांवर भरवसा टाकून जेआरडींनी ही कंपनी नावारुपाला आणली.
एअर इंडिया सरकारने गिळंकृत केली तेव्हा नेहरू आणि जेआरडींचे संबंध चांगले नव्हते.

नेहरू कन्या इंदिरेच्या मैत्रिणींना भारतीय सौंदर्य प्रसाधने हवी होती कारण विदेशी महाग पडत होती.. लाडक्या लेकीचा हट्ट पुरवायला आठवले परत जेआरडीच आणि त्यांचा मोठेपणा इतका की नवी कंपनी काढलीही. लॅक्मे....
फ्रेंच शब्द आहे हा. सौंदर्यवती लक्ष्मी असा अर्थ.

1962 ला चीन च्या आक्रमणानंतर हवाई संरक्षणासाठी सरकारने जेआरडींचा अनुभव लक्षात घेऊन एक अहवाल करायला सांगितला.जेआरडींनी तो केला आणि वैशिष्ट्य म्हणजे आजही तो रेफरन्स म्हणून वापरतात. त्यांना मग मानद एअर कोमोडोर ची उपाधी ही दिली राष्ट्रपतींनी.

त्यांची जागतिक उंची समजण्यास एकच उदाहरण पुरेसं आहे कि नोबेल पुरस्काराच्या त्रिसदस्यीय समितीचे ते एक सदस्य होते.
देश स्वतंत्र होताना मूलभूत संशोधनासाठी एक संस्था देशात हवी म्हणून टाटा इंस्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च स्थापणारे आणि इदं न मम म्हणत ती होमी भाभांच्या समर्थ खांद्यांवर देणारे द्रष्टे जेआरडी.
आयटी चा भारतात पत्ता ही नसताना software कंपनी हवी भारतात ही जाणीव ठेवणारे उद्योगपती म्हणजे जेआरडी...कंपनी टाटा कंसल्टन्सी सर्व्हिसेस.
1987 ला तामिळनाडू त होसुर येथे एक कारखाना काढला टाटांनी . गावचीच 400 मुलं घेतली 12वी झालेली. प्रशिक्षण दिलं आणि टाटा म्हणजे कोण आणि कारखाना म्हणजे काय याबद्दल अवाक्षर ही माहिती नसलेली मुलं कामाला लागली आणि एक लोकप्रिय ब्रँड तयार झाला..टायटन.
आज तीन कारखाने आहेत आणि हजारावर लोक कामाला आहेत. सर्व स्थानिक...हे समाजभान टाटांचे.
दुधात साखर मिसळावी तितक्याच सहजतेने भारतीय जनमानसात आपलेसे झालेले, विश्वासाचे दुसरे नाव असलेले म्हणजे टाटा.
त्यांचे बोधचिन्ह म्हणते...उच्च विचार, उच्च भाषा आणि उच्च वर्तन...
हे सांभाळून संपत्ती निर्माण करून सतत चढतं राहिलेलं उद्योगतोरण म्हणजेच...टाटायन....

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharm & Darshan !! Datta Mandir , Indore !!

 यह चित्र इंदौर के प्राचीन दत्त मंदिर का है इस मंदिर से शिवाजी और उनके गुरु रामदास जी का भी संबंध रहा है। यह मंदिर संजय सेतु के नजदीक है। इं...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!