हरवलेला भक्त
रेल्वे गर्दीने भरून गेली होती... टी. सी ला एक पाकीट सापडते.
त्यात काहीच पुरावा नसल्याने काहीच अंदाज येईना शेवटी त्याने विचारले, "ही पर्स कुणाची आहे?"
तेव्हा एक आजोबा येतात
आणि म्हणतात "माझी आहे."
टी.सी म्हणतो, "खात्री कशी पटणार?"
आजोबा म्हणतात, "त्यात श्री पांडुरंगा चा फोटो आहे..."
त्यावर टी सी म्हणतो
"असा फोटो कोणाकडेही सापडेल.त्यात काय विशेष? तुमचा फोटोही नाही"
त्यावर आजोबा शांतपणे उत्तर देतात...
"मी शाळेत असताना ही पर्स मला वडिलांनी दिली होती, थोडे पैसे खाऊसाठी दिलेले असायचे, तेव्हा आई बाबांचा फोटो लावला होता... जसा कॉलेज कुमार झालो तेव्हा माझा मला फोटो आवडायचा, त्यांचा फोटो काढून मग माझा फोटो ठेवायला लागलो, नंतर लग्न झालं... माझी बायको सुंदर होती, माझा फोटो काढून मग तिचा फोटो ठेवू लागलो, काही वर्षांनी आम्हाला एक मुल झाले... आयुष्याचं नविन पर्व सुरु झालं... मग त्याचा फोटो ठेवू लागलो..."
मात्र हे सगळ सांगताना आजोबांचे डोळे पाणावले गेले,
ते बोलतच राहिले, म्हणाले...
"काही वर्षापूर्वी माझे आई बाबा गेले, नंतर माझी पत्नीही साथ सोडून गेली... ज्या मुलाला मी वाढवलं त्यानेही मला सोडलं...
तो आता त्याच्या आयुष्यात व्यस्त झालाय... मला पाहायला त्याच्याकडे वेळ नाही...
म्हणून आता माझ्या पर्स मध्ये मी श्री विठोबा चा फोटो ठेवलाय... मला कळून चुकलयं की,
पांडुरंग माझे शाश्वत साथी आहेत, माझी साथ कधीच सोडणार नाहीत ! जर मला आधीच कळलं असतं की, जे प्रेम मी माझ्या कुटुंबावर केले तेच मी माझ्या पांडुरंगा वर केले असते तर असा एकटा पडलो नसतो..."
टी. सी ने त्या आजोबांची व्यथा समजून घेतली आणि पर्स परत केली.
त्याच टी सी ने पुढच्या स्टेशनला उतरून एका फोटो विक्रेत्याकडे जाऊन विचारले,
"पांडुरंगा चा फोटो आहे का? मला माझ्या पर्स मध्ये ठेवायचा आहे..!"
ओम राम कृष्ण हरी माऊली
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें