मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

शुक्रवार, 5 जुलाई 2024

Ek Marathi Kavita !!

 दाम्पत्य दिनाच्या 

 *६०+,७०+ ८०+ चे भाग्यवान जेष्ठ नागरिक जोडप्यांना  खूप खूप हार्दीक शुभेच्छा* 

प्रत्येकाच्या नशिबात

एक बायको असते

आपणास कळतही नसते

डोक्यावर ती केव्हा बसते

बायको इतरांशी बोलताना

गोड, मृदू स्वरात बोलते

अजून ब्रह्मदेवालाही कळाले नाही

नवऱ्याने काय पाप केलेले असते

ज्ञानेश्वराने भिंत चालवली

बायको त्यांचं कौतुक करते

सालं नवरा अख्खं घर चालवितो

तेव्हा मात्र बायको गप्प असते

वस्तू कुठे ठेवली हे

बायको विसरते

दिवसभर नवऱ्यावर

उगीचच डाफरते

लग्नात पाचवारी बायकोला

खूप होत होती मोठी

आता नऊवारी गोल नेसतानाही

बायकोला होतेय खूपच छोटी

बायकोच्या प्रेमाची गड्यांनो

तर्‍हाच खूप  न्यारी असते

पाहिजे तेव्हा रेशन लागते

नको तेव्हा उतू जाते

वयाच्या साठीनंतर

एक मात्र बरं असतं

बायको ओरडली तरी

नवऱ्याला ऐकू येत नसतं

 काट्याकुट्याच्या रस्त्यातून

  नवरा किती मस्तीत चालतो

    याला कारण खरं बायकोचा

    मस्त, धुंद सहवास असतो

   बायको गावाला गेली की

       देवाशपथ, करमत नसतं

       क्षणाक्षणाला रुसणारं

       घरात कुणीच नसतं

        नवरा-बायकोचं

       वेगळंच नातं असतं

       एकमेकांचं चुकलं तरी

       एकमेकांच्याच मिठीत जातं

     बायकोवर रागावलो तरी

       तिचं नेहमी काम पडतं

       थोडावेळ जवळ नसली तर

       आपलं सर्वच काही अडत असतं

        अव्यव्यस्थित संसाराला

       व्यवस्थित वळण लागते

       त्यासाठी अधूनमधून

       बायकोचं ऐकावंच लागते

      बायकोशी भांडताना 

      मन कलुषित नसावं

      दोघांचं भांडण

      खेळातलंच असावं

     नाती असतात पुष्कळ

      पण कुणी कुणाचं नसतं

      खरं फक्त एकच

      नवरा  बायकोचं "नातं" असतं

         सर्व दांपत्याना समर्पित

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Dharavahik crime thriller (220) Apradh !!

Just now they had only saved two lack and fifty thousand of rupees which were Nirmal’s father kept for Seema’s wedding . They had already gi...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!