मेरे बारे में---Nirupama Sinha { M,A.{Psychology}B.Ed.,Very fond of writing and sharing my thoughts

मेरी फ़ोटो
I love writing,and want people to read me ! I some times share good posts for readers.

रविवार, 10 दिसंबर 2017

Dharm & Darshan !! MARATHI DESHASTH !!

आम्ही "देशस्थ"......

"कोणत्याही गोष्टीत मोठा हात, घड्याळाच्या काट्या मागे न धावणं, गप्पा मारताना अगदी अमक्याच्या लग्नाच्या मेनुपासून ते मोदींच्या परदेश नीतीपर्यंत सगळ्या विषयांचा व्यवस्थित उहापोह, घरात आलेल्याचं नुसतं आग्रहानेच पोट भरणं" या सारख्या काही गोष्टी म्हणजे देशस्थ असण्याच्या "लिटमस टेस्ट" आहेत. यातली एकही गोष्ट खऱ्या देशस्थात कमी प्रमाणात वगैरे सापडणार नाही.
           वेळेच्या बाबतीत देशस्थांनी त्या घड्याळाला कधीही फारसं महत्त्वही दिलं नाही किंवा त्याला डोईजडही होऊ दिलं नाही. मुळात घड्याळ माणसासाठी असतं हे आम्ही अगदी पक्क डोक्यात ठेवलंय. त्यामुळे एखाद दिवशी काही कारणाने नाश्ता राहिलाच तर तो दुपारी बारा वाजता होऊन दुपारचं जेवण ३ लाही होऊ शकतं. तसंच समजा डिनर एखाद्या मल्टी cuisine रेस्टॉरंट मध्ये झाला, आईस्क्रीम वगैरे खाऊन अकरा साडे अकराला घरी आलात  आणि एखाद्याला जरी पोटात सुपारीएवढ्या साधं वरण भात, दही भातासाठी जागा असेल तर रात्री बारालाही देशस्थांच्या घरातून कुकरच्या शिट्ट्या ऐकू येऊ शकतात. मग अशा वेळी, "ही जेवणाची वेळ नाही किंवा ही काय स्वयंपाकाची वेळ आहे का" असले उद्गार अजिबात निघत नाहीत. एका साठी म्हणून भात लावलेला असतो पण थोडा, थोडा म्हणत अख्ख घर भात खाऊनच तृप्त होतं.
           एखादी गोष्ट करण्याच्या बाबतीत देशस्थांचा हात "मोठाच" असतो. विशेषतः स्वयंपाकाच्या बाबतीत. कोणाकडेही गेलं, अगदी देशस्थच नातेवाईक जरी असले तरी छोट्या छोट्या पातेल्यातल्या स्वयंपाकाकडे बघून जेवण जातच नाही. त्यामुळे घरातला आमचा स्वयंपाकही "भरपूर" म्हणावा तसाच असतो. देशस्थांच्यात खिचडी करताना त्याला "हंडा" लावणे म्हणतात ते काही उगाच नाही. राहता राहिला प्रश्न उरलेल्या अन्नाचा तर त्याच्या सुद्धा शेकडो पाककृती देशस्थांच्यात असतात. दूध भात, दही भात, फोडणीचा भात, पोळ्यांचा कुस्करा, दूध पोळी, यांसारखे पदार्थ हे शिळ्या भाताचे/पोळीचेच छान लागतात. याही उपर म्हणजे "शिळासप्तमी" हा एक छानसा सणही आमच्याकडे मोठ्या प्रमाणात होतो.
           इतरांच्या म्हणण्याप्रमाणे देशस्थांचा माणसांचा "पसारा" ही मोठा असतो. पण आमच्याकडे त्याला "गोतावळा" हाच शब्द वापरतात. अमक्याच्या तमक्याच्या मावशीचे मुलं वगैरे ही आमच्या चांगल्या संपर्कात असतात. अशांच्या कार्यात वगैरेही प्रत्येकाची उपस्थिती असतेच असते. कोणीही घरी आलं तरी त्याला न जेवता पाठवतील असं देशस्थांचं घर सापडणारच नाही. काळानुरूप जेवण वगैरे साठी वेळ नसेल तर आग्रह करून जेवणाईतकाच नाश्ता तरी नक्कीच होणार. आणि मग हे करत असताना भरमसाठ गप्पांच्या ओघात १० मिनिटांसाठी आलेला माणूस दोन तास कसा थांबतो ते त्यालाही कळत नाही. "माणसांना आपलसं करण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो" हे सूत्र देशस्थ अगदी नेमाने पाळतात.
           देशस्थी सोहळ्यांविषयी या आधीच लिहिलंय. गौरी गणपती हा उत्सव तर अगदी एखाद्या लग्नकार्यासारखा साजरा होतो. मग त्याही वेळी घड्याळ, माणसांची संख्या, असली बंधने गळून पडलेली असतात. अनेक ठिकाणी गौरी पूजनाला ३०-३५ पदार्थ असतात. घरातला भिगिनी वर्ग हे माहेरवाशिणीचे लाड करताना अजिबात थकत नाहीत. आपण "तिचं" जितकं करू तितकंच ती आपलं करेल हाच भाव मनात असतो. आणि मग या सगळ्या घोळात २०-२५ लोकांची शेवटची पंगत ३ ला बसली तरी त्याचा बाऊ कोणीच करत नाही. नवरात्र, चंपाषष्ठी, शारदीय नवरात्रोत्सव, माघी गणेश जयंती, कुलदैवतेनुसार वर्षातले विविध कुळधर्म, या सारखे सण यथासांग आणि दणक्यात पार पडतात. कुठेही हात आखडता घेतला जात नाही हे विशेष.
            एवढा सगळा गोतावळा सांभाळायचा, सगळे सणही मोठ्याप्रमाणावर साजरे करायचे तर घाई, गडबडही होणारच. मुहूर्ताच्या क्षणापर्यंतही तयारी चालू असली तरी कधीही मुहूर्त चुकला असं होतं नाही. आणि म्हणूनच या सगळ्या घाईचं, पसाऱ्याचं कधीही वावगं वाटलंच नाही. प्रसिद्ध असलेल्या "देशस्थी घोळाचा" कधीच कमीपणा वाटला नाही. पुणे, नाशिक पासून नांदेड पर्यंत तर नागपूर पासून कोल्हापूर पर्यंत पसरलेला देश. मुबलक पाणी, धान्याची, फळांची प्रचंड विविधता, वेगवेगळं वातावरण, यांमुळे आपोआपच सुबत्ता वाढली. अन्न धान्याच्या पुरेपूर उपलब्धतेमुळे त्याचा वापर ही वाढला आणि म्हणूनच जमतील तितक्या माणसांना जेवायला घालून तृप्त करणं ही वृत्ती झाली. त्यामुळे मोजून, मापून हा प्रकारच फारसा माहिती नाही. आणि मग एवढं मॅनेज करायचं तर "घोळ" होऊच शकतो. पण माणसांप्रमाणे त्या "घोळालाही" आपलसं करून पुढे निघातो तो "देशस्थ".......

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

Today's Tip !! Perfect relationships !!

  Relationships start right from the beginning when we born. Relationships with Parents and siblings also change with the time.As we grow up...

Grandma Stories Detective Dora},Dharm & Darshan,Today's Tip !!